Manasvi Choudhary
दिवसभर काम केल्यानंतर रात्री आपण सर्वजण विश्रांती घेतो, झोप येतो.
परंतु, तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का,की रात्र होताच झोप का येत असेल?
रात्री झोप येण्यामागची शरीराची प्रोसेस नक्की काय आहे हे थोडक्यात या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
प्रत्येक मानवी शरीराच्या मेंदूत एक 24 तासांचे अंतर्गत जैविक घड्याळ असते, ज्याला 'सर्केडियन रिदम' म्हणतात. हे घड्याळ प्रकाशाच्या आणि अंधाराच्या आधारे शरीराला कधी जागे राहायचे आणि कधी झोपायचे याचे संकेत देते.
डोळ्यांतील पेशी जेव्हा अंधार पडल्याचे संकेत मेंदूला देतात, तेव्हा मेंदूतील 'पिनियल ग्रंथी' मेलाटोनिन नावाचे हार्मोण रक्तामध्ये सोडते. जे संप्रेरक शरीराचे तापमान कमी करते, स्नायूंना शिथिल करते आणि गाढ झोप लागते.
रात्री उशिरा मोबाईल, टिव्ही आणि लॅपटॉप यामुळे त्यातून निघणारा निळा प्रकाश मेलाटोनिन तयार होण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो आणि वेळेवर झोप येत नाही.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.