Manasvi Choudhary
भेंडीची भाजी खायला सर्वांनाच आवडते. भेंडीच्या भाजीचे अनेक प्रकार महिला बनवतात.
पण तुम्हाला कधी असा भेंडीच्या भाजीच्या नावाचा प्रश्न पडला आहे का?
भेंडीला इंग्रजीत लेडी फिंगर म्हणतात. पण हे नाव नेमकं कसं पडलं? हे तुम्हाला माहितीये का?
भेंडीच्या लेडी फिंगर या नावामागे देखील रंजक इतिहास आहे. भेंडी ही बोटाप्रमाणे नाजूक आणि सुंदर असल्याने भेंडीला लेडी फिंगर म्हणतात असं म्हटलं जाते.
रचना, आकार यामुळे भेंडीच्या भाजीला लेडी फिंगर हे नाव पडलं असं म्हणतात.
भेंडीच्या भाजीला लेडी फिंगर हे नाव इंग्रजाच्या काळात पडलं आहे. ब्रिटनमधील महिलांच्या नाजूक सुंदर बोटांवरून हे नाव पडलं. म्हणून या भाजीला लेडीज् म्हणजे लेडी आणि फिंगर असं म्हणतात.