Saam Tv
आयब्रोचे केस बाहेरील बाजूने हळूहळू कमी होत असतील, तर हे थायरॉईडच्या आजाराचे सर्वात पहिले लक्षण मानले जाते.
हा एक ऑटोइम्यून आजार आहे. ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारकशक्ती थेट शरीरावर असणाऱ्या केसांच्या मुळांवर हल्ला करते. त्यामुळे आयब्रोचे केस गळू लागतात.
आयब्रोच्या आसपास खाज , कोरडेपणा , त्वचा सोलणे यांसारख्या समस्या दिसत असतील तर हे लक्षण त्वचेच्या रोगाचे असते. या आजारामुळे केस विरळ दिसू लागतात.
आयब्रोच्या आसपास तेलकटपणा, पांढरे किंवा पिवळसर खवले दिसत असतील तर सेबोरिक डर्माटायटिस ही त्वचेची समस्या आहे. त्यामुळे आयब्रोचे केस कमी होतात .
आयब्रोच्या आसपास त्वचा जाड होणे, लाल चट्टे किंवा खवले दिसणे हे सोरायसिस या आजाराचे लक्षण आहे . यामुळे केसांची वाढ नीट होत नाही.
शरीरात लोह, व्हिटॅमिन्स, झिंक , प्रथिने मिळत नसतील तर त्याचा परिणाम केसांच्या वाढीवर होतो. यामुळे केस गळती देखील होऊ शकते.
तीव्र ताण असेल किंवा मानसिक ताण घेत असाल त्याचा परिणाम केसांवर होतो. केस गळू लागतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.