Thick Hair Tips : तुम्हालाही लांब, घनदाट आणि मजबूत केस हवेत? मग हे ६ घरगुती उपाय नक्की करा

Saam Tv

नारळ तेलाने मसाज करा

नारळ तेलाने काही मिनिटे टाळूची हलक्या हाताने मालिश करा. यामुळे केस आणि टाळूला मॉइश्चर मिळेल. केस मुळापासून मजबूत होतील.

Thick Hair Tips | PINTREST

अॅलोवेरा जेल

अॅलोवेरामुळे टाळूला थंडावा मिळेल. कोंडा कमी होईल. यामुळे केस कोरडे होऊन गळणार नाहीत. केसांवर चमक कायम राहिल.

Thick Hair Tips | PINTREST

मेथीचा हेअर पॅक

मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून त्याची पेस्ट केसांना लावून २० मिनिटांनी धुवा. असे केल्याने केस निरोगी आणि मजबूत होतील.

Thick Hair Tips | PINTREST

दही आणि अंड्याचा पॅक

दही आणि अंडे एकत्र करून केसांना लावा. हा पॅक केसांना प्रोटीन आणि मॉइश्चर देण्यास मदत करतात. अंड्यामुळे केस सिल्की होतात.

Thick Hair Tips | PINTREST

कांद्याचा रस

कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण अधिक असते. रस काढून टाळूवर, स्कॅल्पवर लावा. त्यामुळे नवीन केसांची वाढ पटकन होते. केस घनदाट दिसू लागतात.

Thick Hair Tips | PINTREST

कॅस्टर ऑईल

कॅस्टर ऑईलमध्ये फॅटी अॅसिड भरपूर असते. त्यामुळे केस जलद वाढण्यास मदत होते. नारळाच्या तेलात कॅस्टर ऑईल मिसळून टाळूला लावा. यामुळे केस मजबूत होतील.

Thick Hair Tips | PINTREST

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Thick Hair Tips | PINTREST

Thyroid Health : तुमचंही वजन विनाकारण वाढतंय? 'या' ५ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकतो थायरॉईड

Thyroid Symptoms | META AI
येथे क्लिक करा