Health Tips : पाणी प्यायल्यानंतरही सतत तहान का लागते? जाणून घ्या कारण

कोमल दामुद्रे

सतत तोंड कोरडे पडणे

उन्हाळ्यात तोंड सतत कोरडे होण्याची समस्या खूप सामान्य आहे. तहान लागल्यावर किंवा उन्हामुळे तोंड कोरडे होते. यासाठी आपण पाणी पितो.

तहान लागणे

अनेकदा पाणी प्यायल्यानंतरही काही मिनिटांनी आपल्याला पुन्हा तहान लागते. यांचे अनेक कारणे आहेत.

डिहायड्रेशनची समस्या

अनेकवेळा भरपूर पाणी प्यायल्यानंतरही तोंड कोरडे पडते. याचे कारण डिहायड्रेशनची समस्या असू शकते.

पुरेशा प्रमाणात पाणी प्या

अशावेळी शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे. जेव्हा तुम्हाला तहान लागली असेल किंवा उष्णता असेल तेव्हा वेळोवेळी पाणी पित रहा.

ऍलर्जी

जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची ऍलर्जी असल्यास किंवा त्यामुळे पाणी प्यायल्यानंतरही तोंड कोरडे पडू शकते.

मधुमेह

मधुमेही रुग्णांना यामुळे वारंवार लघवी होण्याची समस्या असू शकते. अशा परिस्थित त्यांच्या शरीरात पाण्याची कमतरता होते. त्यामुळे तोंड किंवा घसा कोरडा पडू शकतो.

फ्लू

सर्दी आणि फ्लू सारख्या विषाणूजन्य संसर्गामुळे तुमचा घसा कोरडा पडू शकतो. याव्यतिरिक्त घशात खाज सुटू शकते.

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Next : आरोग्यासाठी व्हिटॅमिन सी गरजेचे आहे का?

Vitamin C Benefits | saam tv