Surabhi Jayashree Jagdish
वटपौर्णिमा हा सण मुख्यतः पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी साजरा केला जातो.
या दिवशी विवाहित स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात आणि एकमेकींना वाण देतात. या वाणामध्ये विविध वस्तूंबरोबरच विशिष्ट फळांचा समावेश असतो.
वटपौर्णिमेच्या वाणात 5 फळांचा समावेश असतो. मात्र त्यामागील अर्थ तुम्हाला माहितीये का?
उन्हाळ्याच्या शेवटी आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला आंबा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतो. वाणामध्ये आंबा देऊन कुटुंबात समृद्धी आणि गोडवा यावा अशी कामना केली जाते.
जांभूळ हे जून-जुलै महिन्यात येणारे फळ आहे. त्याचा रंग गडद असल्याने ते गंभीरपणा आणि स्थैर्याचे प्रतीक मानले जाते.
करवंद हे लहान, आंबट-गोड फळ आहे जे पावसाळ्याच्या सुरुवातीला येतं. हे फळ साधेपणा, नैसर्गिकता आणि आरोग्य यांचे प्रतीक मानलं जातं
फणस हे मोठे आणि अनेक बिया असलेले फळ आहे. हे फळ वंशवृद्धी, भरभराट आणि कुटुंबाचा विस्तार यांचे प्रतीक आहे. वडाच्या झाडाप्रमाणेच कुटुंबाचा विस्तार व्हावा आणि ते समृद्ध असावे या प्रार्थनेसह फणसाचा वाणात समावेश केला जातो.
केळे हे वर्षभर उपलब्ध असले तरी, ते शुभ मानले जाते आणि पूजेमध्ये त्याचा नेहमीच वापर केला जातो. केळे हे सुपीकतेचे, समृद्धीचे आणि सातत्याचे प्रतीक आहे.