Surabhi Jayashree Jagdish
स्मार्टफोनच्या खालच्या बाजूला दिसणाऱ्या छोट्या छिद्रांपैकी एक मुख्य मायक्रोफोन असतो. कॉल करताना किंवा व्हॉइस मेसेज आणि ऑडिओ रेकॉर्डिंग करताना हा मायक्रोफोन तुमचा आवाज टिपतो. त्यामुळे समोरील व्यक्तीपर्यंत तुमचा आवाज स्पष्टपणे पोहोचण्यास मदत होते.
अनेक आधुनिक स्मार्टफोनमध्ये एकापेक्षा जास्त मायक्रोफोन दिलेले असतात. हे मायक्रोफोन एकत्र काम करून आजूबाजूचा अनावश्यक आवाज कमी करण्यासाठी नॉइज कॅन्सलेशन तंत्रज्ञानाचा वापर करतात.
अनेक स्मार्टफोनमध्ये कॅमेऱ्याजवळही एक लहान छिद्र असते. हे देखील स्वतंत्र मायक्रोफोन असतं जे व्हिडिओ रेकॉर्डिंगदरम्यान आवाज अधिक स्वच्छ आणि नैसर्गिक पद्धतीने टिपतं.
स्पीकर मोडवर कॉल करताना फोनमधील अतिरिक्त मायक्रोफोन एक्टिव्हपणे काम करतात. हे मायक्रोफोन तुमचा आवाज आणि आसपासचा आवाज वेगळा ओळखून संभाषण अधिक स्पष्ट ठेवण्याचा प्रयत्न करतात.
अनेक स्मार्टफोनमध्ये स्मार्ट असिस्टंटसाठी स्वतंत्र मायक्रोफोनची व्यवस्था असते. त्यामुळे "Hey Google" किंवा "Hey Siri" अशी कमांड दूरून दिली तरी फोन ती ओळखू शकतो.
फोनच्या SIM ट्रेजवळ दिसणारे छोटे छिद्र मायक्रोफोन नसते. या छिद्रात SIM इजेक्टर पिन घालून SIM ट्रे सुरक्षितपणे बाहेर काढता येतं. त्यामुळे SIM कार्ड बदलणं किंवा नवीन SIM बसवणं सोपं होतं.
मायक्रोफोनची छिद्रं धूळ किंवा घाण साचल्यास आवाजाच्या क्विलीटीवर परिणाम होऊ शकतो. ही छिद्रं साफ करताना धारदार वस्तू वापरू नयेत, कारण त्यामुळे मायक्रोफोन खराब होण्याची शक्यता असते.