Surabhi Jayashree Jagdish
तुम्हाला माहितीये का विमानातील दोन्ही पायलटना नेहमी वेगवेगळं जेवणं दिलं जातं. हे असं का करतात ते आपण आज जाणून घेऊया.
विमानातील दोन्ही पायलटला वेगवेगळं जेवण देण्यामागचं मुख्य कारण म्हणजे सुरक्षितता
जर पायलट आणि सह-पायलट दोघांनीही एकाच प्रकारचं जेवण दिलं आणि त्या जेवणात काही गडबड झाली, तर दोन्ही पायलट एकाच वेळी आजारी पडू शकतात.
अशा परिस्थितीत जर एका पायलटला अन्नातून विषबाधा झाली, तर दुसरा पायलट विमानाचे नियंत्रण सुरक्षितपणे सांभाळू शकतो. यावेळी आवश्यकतेनुसार विमान सुरक्षितपणे उतरवू शकतो.
१९८२ मध्ये बोस्टनहून लिस्बनला जाणाऱ्या एका विमानातील ८ क्रू मेंबर्सना दूषित पुडिंगमुळे अन्नातून विषबाधा झाल्याची एक घटना घडली होती.
त्यावेळी सह-पायलटने ते पुडिंग खाल्ले नव्हते आणि तो सुरक्षित होता, ज्यामुळे विमानाला सुरक्षितपणे उतरवता आले.
काही लोकांना विशिष्ट पदार्थांची ऍलर्जी असते. जर दोन्ही पायलटला एकाच प्रकारचे जेवण दिले गेले आणि त्या जेवणात ऍलर्जी निर्माण करणारा पदार्थ असेल, तर दोघांनाही एकाच वेळी ऍलर्जीची समस्या येऊ शकते.