Manasvi Choudhary
हिंदू धर्मात लग्नाआधी अनेक विधी केले जातात या विधीपैकी एक म्हणजे हळद समारंभ. हळद समारंभ झाल्यानंतर वधू आणि वरांना घराबाहेर पडण्यास मनाई आहे.
हिंदू संस्कृतीत लग्नाआधी हळद कार्यक्रमाला अत्यंत महत्वाचे मानले जाते. लग्नात हळद लावणे हे केवळ सौंदर्यासाठी नाही तर शुभ संकेत म्हणून देखील मानले जाते.
हळद लावल्यानंतर वधू- वरांना घराबाहेर पडण्याची परवानगी नाही जेणेकरून त्याची सकारात्मक ऊर्जा राहील तसेच लग्नात कोणतेही अडथळे येणार नाहीत.
ज्योतिषशास्त्रानुसार, हळदीचा सुंगध राहू आणि केतू ग्रहांशी संबंधित आहे लग्नात हळदीच्या विधीनंतर घराबाहे पडल्याने या ग्रहांचा प्रभाव वाढू शकतो ज्यामुळे मानसिक समस्या उद्भवू शकतात.
शरीरावर हळद लावल्यानंतर घराबाहेर पडल्यानंतर घाण आणि धूळ सहज जमा होऊ शकते यामुळे लग्नात हळदीच्या समारंभानंतर वधू आणि वरांना बाहेर जाण्यास मनाई आहे.
भारतीय परंपरेत हळदीचा पिवळा रंग समृध्दीचं प्रतीक माणले जाते. लग्नाआधी हळद लावणे शुभ शकुन आहे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.