Manasvi Choudhary
चण्याच्या डाळीचे बेसनापासून विविध चवीष्ट पदार्थ बनवले जातात. बेसन वडी चवीला अत्यंत रूचकर लागते. तुम्ही घरीच अत्यंत सोप्या पद्धतीने बेसनाची वडी बनवू शकता.
बेसनाची वडी बनवण्यासाठी बेसन पीठ, कांदा, मिरची, कोथिंबीर, जिरे, हळद आणि मीठ हे साहित्य एकत्र करा.
परातीमध्ये बेसन पीठ, बारीक चिरलेला कांदा, मिरची, कोथिंबीर, जिरे, हळद आणि मीठ याचे एकत्र मिक्स करा.
या मिश्रणात थोडेस पाणी मिक्स करून घट्टसर बेसन वडी पीठ तयार करा. पीठ जास्त पातळ होणार नाही याची काळजी घ्या.
परातीमध्ये तेल लावून हे पीठ पातळ थापून त्याचे चौकोनी काप कापून घ्या. गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये हे काप तळून घ्यायचे आहे.
अशाप्रकारे महाराष्ट्रीयन प्रसिद्ध बेसनाची वडी घरच्या घरी तयार होईल. तुम्ही हे बेसनाचे काप पिठल्यात किंवा आमटीमध्ये देखील शिजवून खाऊ शकता.