Manasvi Choudhary
हिवाळ्यात गूळ खाणे आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानले जाते. आजकाल बाजारात बनवाट आणि रासायन मिश्रित गूळाची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. यासाठी बाजारातला ओरिजनल गूळ कसा ओळखायचा?
गुळाचा रंग गडद तपकिरी आणि नैसर्गिक असतो. बनावट गूळ हा काळ्या रंगाचा आणि चमकदार असू शकतो.
गुळाला सौम्य असा गोड सुंगध असतो मात्र बनवाट गूळ तुम्हाला तिखट आणि कृत्रिम रसायनासारखा असू शकतो.
गूळ हा किंचित गोड आणि नैसर्गिक चवीचा असतो मात्र बनवाट गूळ कधीकधी खूप गोड किंवा थोडा कडू देखील असू शकतो. बनवाट गूळ पाण्यात लवकर विरघळतो तर खरा गूळ हा पाण्यात हळूहळू विरघळतो.
गूळ हा थंड तापमानात थोडासा कडक होतो तर बनवाट गूळ हा थंडीतही खूप मऊ आणि चिकट राहू शकतो.
गूळ हा कठीण असतो त्याची पोत एकसारखी असते तर बनवाट गूळ चिकट आणि मऊ असू शकतो.