Dhanshri Shintre
दररोज कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करतात, आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठीही ती सर्वोत्तम सुविधा आहे.
पण तुम्हाला कधी वाटलं आहे का, रेल्वे रुळांच्यामध्ये दगड ठेवण्यामागचं कारण काय असतं?
रेल्वे ट्रॅकच्या मजबुती आणि सुरक्षिततेसाठी वापरले जाणारे बारीक दगड “बॅलास्ट” म्हणतात, जे ट्रॅकला स्थिर ठेवतात.
बॅलास्टाखाली दोन मातीचे थर असतात आणि त्याखाली जमीन असते, जी रुळांच्या आधारासाठी महत्त्वाची भूमिका बजावते.
रेल्वे ट्रॅकवरून गाडी धावताना कंपन निर्माण होतात, त्यापासून बचाव आणि रुळांच्या स्थिरतेसाठी दोन रुळांमध्ये मध्यम आकाराचे दगड टाकले जातात.
हे दगड एकत्र येऊन मजबूत पाया तयार करतात ज्यामुळे रुळ स्थिर राहतात; नसल्यास रुळ वाकडे होऊ शकतात आणि अपघात होण्याची शक्यता वाढते.
पावसाळ्यात रुळांभोवती पाणी साचल्याने गंज आणि कमकुवत होण्याचा धोका असतो, पण दगड रुळ कोरडे ठेवून पाणी बाहेर जाण्यास मदत करतात.
ट्रेनचे जास्त वजन बॅलास्ट दगडांमुळे जमिनीपर्यंत समान वितरित होते, ज्यामुळे रुळ टिकाऊ राहतात आणि तुटण्याचा धोका कमी होतो.
उन्हाळा-हिवाळ्यात धातूचे ट्रॅक विस्तारतात किंवा आकुंचन होतात, बॅलास्ट स्टोन ट्रॅकला लवचिकता देऊन तुटण्यापासून बचाव करतात.