Dhanshri Shintre
गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाच्या प्रारंभाचा सण असून तो महाराष्ट्र आणि कोकणात उत्साहात साजरा केला जातो.
या दिवशी लोक शुभ प्रतीक म्हणून गुढी उभारतात आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पारंपरिक पद्धतीने सण साजरा करतात.
गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंब आणि गूळ प्रसाद म्हणून घेतले जातात, कारण त्यांना आरोग्यासाठी लाभदायक आणि शुभ मानले जाते.
गुढीपाडव्याला कडुलिंब आणि गूळाचा नैवेद्य अर्पण करणे हे सुख-दुःख समभावाने स्वीकारण्याचे प्रतीक मानले जाते.
कडुलिंब जीवनातील संकटांचे प्रतीक आहे, तर गूळ आनंदाचे प्रतिक असून, गुढीपाडव्याला दोन्ही एकत्र सेवन करणे समतोल जीवन दर्शवते.
कडुलिंबातील जंतुनाशक आणि बुरशीनाशक गुणधर्म शरीराला फायदेशीर ठरतात, ते त्वचा स्वच्छ ठेवतात आणि रक्त शुद्ध करण्यास मदत करतात.
कडुलिंबात असलेल्या अँटीऑक्सिडंट्समुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, त्वचा निरोगी राहते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते.
गुळामध्ये लोहतत्त्व, अँटीऑक्सिडंट्स आणि उर्जा असते, जे शरीराला मजबूती आणि ताकद प्रदान करतात, गुळामुळे पचन सोपे होते.
गुळामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर असते, जे हाडांचे आरोग्य सुधारण्यास आणि त्यांना मजबूत ठेवण्यास मदत करते.