Surabhi Jayashree Jagdish
‘माय लॉर्ड’ हा एक आदराने वापरला जाणारा संबोधन आहे, ज्याचा अर्थ आहे ‘माझे प्रभु’.हा शब्द न्यायाधीशांबद्दल आदरभाव व्यक्त करतो आणि त्यांच्या पदाची प्रतिष्ठा अधोरेखित करतो.
‘माय लॉर्ड’ ही परंपरा ब्रिटिश वसाहतवादी काळापासून सुरू झाली. ब्रिटिश न्यायालयांमध्ये न्यायाधीशांना ‘लॉर्ड’ म्हणून संबोधून त्यांना मान दिला जात असे.
भारतावर ब्रिटिशांचं राज्य असताना कोर्टात ही परंपरा स्वीकारली गेली. आजही सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांमध्ये न्यायाधीशांना ‘माय लॉर्ड’ म्हणून संबोधले जाते.
काही न्यायालयांमध्ये ‘युअर ऑनर’ हा शब्द वापरला जातो, ज्याचा अर्थ ‘आपला मान’ किंवा ‘आपला सन्मान’ असा होतो.
काही लोकांच्या मते ‘माय लॉर्ड’ हे योग्य नाही आणि त्यामुळे ते हटवले जावं. सर्वोच्च न्यायालयाने याला पर्यायी मानले आहे.
आजच्या काळात ‘माननीय न्यायाधीश’ किंवा ‘सर/मॅडम’ यांसारखे संबोधन देखील प्रचलनात आले आहे.
‘माय लॉर्ड’ किंवा ‘युअर ऑनर’ हे संबोधन न्यायालयाची प्रतिष्ठा आणि न्यायप्रक्रियेप्रती आदरभाव जपण्याचा एक भाग आहे.
ब्रिटन, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांत आजही ‘माय लॉर्ड’ प्रचलित आहे. तर अमेरिकेत ‘युअर ऑनर’ हा शब्द अधिक प्रमाणात वापरला जातो.