Manasvi Choudhary
तुम्ही देखील हॉटेलमध्ये पांढऱ्या रंगाच्या चादर आणि ब्लॅकेट पाहिल्याच असतील. तुम्हालाही कधी असा प्रश्न पडलाच असेल? की हॉटेलमध्ये चादर पांढऱ्या रंगाच्या का असतात? रंगीबेरंगी का नाही.
हॉटेलमध्ये पांढऱ्या रंगाच्या चादर असण्यामागचे कारण म्हणजे त्या धुण्यासाठी सोयीस्कर होते. रंगीबेरंगी चादरचा रंग जाण्याची शक्यता असते.
पांढऱ्या चादरवर डाक लगेच दिसतात यामुळे त्या नियमितपणे धुतल्या की स्वच्छ दिसतात.
रंगीत चादरपेक्षा पांढऱ्या चादर या वापरण्यासाठी सोयीस्कर वाटतात कारण त्या एकत्र धुतल्या जातात.
पांढरा रंग हा शांती, पवित्र रंगाचे प्रतिक मानले जाते. दिवसभराचा संपूर्ण थकवा दूर होतो.
हॉटेलच्या सर्व बेडरूममधील चादर या एकसारख्या असाव्या यामुळे सर्व हॉटेल्सच्या चादर या पांढऱ्या रंगाच्या असतात तसेच त्या स्वच्छ आणि नीटनेटक्या वाटतात.
पांढऱ्या चादरमुळे हॉटेल्सचे बेडरूम स्वच्छ आणि अलिशान प्रसन्न दिसते.