Manasvi Choudhary
उन्हाळ्याच्या दिवसात घामामुळे केस तुटणे, केस गळण्याच्या समस्या वाढतच राहतात. प्रत्येक वयोगटातील महिला व मुलींना हा त्रास उद्भवतो.
केस गळतीच्या समस्यांवर रामबाण उपाय सांगितला आहे. अभिनेत्री दिशा पटानीच्या आईने खास घरगुती तेल सांगितलं आहे.
दिशा पटानीची बहीण खुशबूने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. केस गळती होऊ नये म्हणून कोणते तेल लावावे याविषयी सांगितले आहे.
खोबरेल तेल, कांदा, कढीपत्ता आणि जास्वंदाची पाने या साहित्यापासून तुम्ही तेल बनवायचे आहे.
सर्वात आधी गॅसवर एका कढईमध्ये खोबरेल तेल गरम करा नंतर त्यात बारीक केलेला कांदा, कढीपत्ता पाने आणि जास्वंदाची पाने मिक्स करा.
संपूर्ण साहित्य मिक्स केल्यानंतर तेल चांगले गरम करा. साहित्य करपणार नाही याची काळजी घ्या. तेल थंड झाल्यानंतर एका काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवा. हे तेल तुम्ही महिनाभर साठवून ठेवू शकता.
केस धुण्यापूर्वी १ तास आधी तेल केसांना लावा आणि नंतर कोमट पाण्याने केस धुवा.