Dhanshri Shintre
हिंदू धर्मात मृत्यूनंतर व्यक्तीच्या शेवटच्या प्रवासात चितेवर फुलं आणि पैसे अर्पण करण्याची परंपरा पाळली जाते.
वडिलधाऱ्या व्यक्तींनुसार, फुले आणि पैसे अर्पण करून मृत व्यक्तीला आदर आणि श्रद्धांजली दिली जाते, हा परंपरेचा भाग.
फुलं शांतीचे प्रतीक मानली जातात, ज्यामुळे मृत्यात्म्याला शांती मिळते आणि फुलांमधून सकारात्मक ऊर्जा संचारते.
फुले निसर्गाशी संबंधित असल्यामुळे, मृत व्यक्तीचा आत्मा निसर्गाशी जोडला जातो, अशी श्रद्धा आहे.
अंत्यसंस्कारात चितेवर पैसे अर्पण करणं दानाचं प्रतीक मानलं जातं, ज्यामुळे मृत आत्म्याला शांती आणि स्वर्गात स्थान मिळतं.
काही भागात अंत्यसंस्कारासाठी खर्च भागवण्यासाठी पैशाचं दान केलं जातं, जे एक सामाजिक परंपरेचा भाग मानलं जातं.
मृतदेहाजवळ नाणी ठेवून एक सामाजिक संदेश दिला जातो, की मृत्यूनंतर व्यक्ती कोणताही संपत्ती सोबत घेत नाही.
काहींच्या मते, फुले आणि पैसे अर्पण केल्याने मृत आत्म्याच्या प्रवासात आणि कुटुंबाच्या दुःखातून सावरण्यात मदत होते.