Dhanshri Shintre
घरात काहीही ठेवताना वास्तूचे नियम लक्षात ठेवले पाहिजेत. या नियमांचे पालन न केल्यास वास्तुदोष निर्माण होऊ शकतात.
बरेच लोक तुटलेल्या आरशात चेहरा पाहतात. असे करणे अशुभ मानले जाते. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते आणि आशीर्वाद मिळणे थांबू लागते.
तुटलेल्या आरशात आपला चेहरा पाहणे आयुष्यात दुर्दैव आणते. हे टाळण्यासाठी तुटलेली काच घराबाहेर फेकून द्यावी.
तुटलेल्या काचेचा वापर केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सकारात्मकता नाहीशी होऊ लागते आणि नकारात्मक ऊर्जा वाढू लागते. यामुळे व्यक्तीला समस्यांना तोंड द्यावे लागते.
चेहरा पाहण्यासाठी चांगल्या आरशाचा वापर करावा. तुटलेल्या आरशात चेहरा पाहिल्याने ताण वाढतो. यामुळे मानसिक आजाराचा धोकाही वाढतो.
जर तुम्ही तुटलेल्या आरशात तुमचा चेहरा पाहिला तर त्याच्या तुमच्या करिअरवर परिणाम होऊ शकतो. यामुळे तुम्हाला अपयशाला सामोरे जावे लागू शकते.
घरात तुटलेली काच ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांना गरिबीचा सामना करावा लागू शकतो. याशिवाय, व्यवसायावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो.