Bone Health : कमी वयातच हाडं का कमकुवत होतात? जाणून घ्या या ५ गंभीर चूका

Sakshi Sunil Jadhav

बदलती लाईफस्टाइल

कमी हालचाल, चुकीचा आहार, आणि ताणावामुळे तरुणांमध्येही हाडं कमकुवत होण्याच्या समस्या वाढल्या आहेत.

Changing lifestyle

कॅल्शियमची कमतरता

हाडांच्या मजबुतीसाठी कॅल्शियम अत्यंत आवश्यक आहे. जर याची कमी झाली की बोन डेन्सिटी कमी होईन ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढतो.

Calcium deficiency

व्हिटॅमिन D ची कमतरता

व्हिटॅमिन D ची शिवाय शरीर कॅल्शियम योग्य प्रकारे शोषून घेऊ शकत नाही. त्यामुळे रोज काही वेळ सूर्यप्रकाशात राहा.

Vitamin D deficiency

नियमित व्यायामाचा अभाव

दिवसभर बसून काम केल्यामुळे हाडांवर योग्य ताण पडत नाही. चालणे, जिने चढणे, जॉगिंग आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगसारखे व्यायाम हाडे मजबूत ठेवण्यात मदत करतात.

Lack of regular exercise

जास्त मीठाचे पदार्थ

जास्त मीठ खाल्ल्याने शरीरातून कॅल्शियम बाहेर पडू शकतं. त्याने हाडांवर नकारात्मक परिणाम होतो.

High salt intake

धूम्रपान आणि मद्यपान

धूम्रपान आणि अतिमद्यपानामुळे हाडांच्या नैसर्गिक पुनर्बांधणी प्रक्रियेवर परिणाम होतो. त्यामुळे हाडे कमकुवत होईन फ्रॅक्चरचा धोका वाढतो.

Smoking and alcohol

संतुलित आहार घ्या

दूध, दही, पनीर, तीळ, सोयाबीन आणि हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करा.

Eat a balanced diet

टीप (Disclaimer)

ही माहिती सामान्य आरोग्यविषयक माहितीसाठी आहे. कोणतेही औषध किंवा सप्लिमेंट सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Disclaimer

NEXT: मक्याच्या केसांचा चहा कधी प्यायलात का? किडनीपासून शुगरपर्यंत आजार होतील दूर

Corn Silk Tea | meta ai
येथे क्लिक करा