1 डझनमध्ये 12 नग का मोजले जातात? काय आहे त्यामागे कारण?

Surabhi Jayashree Jagdish

डझन

आपण जेव्हा कधी कुठलीही वस्तू डझनमध्ये खरेदी करतो, तेव्हा ती वस्तू नेहमी १२ नग म्हणजेच १२ संख्येतच मिळते.

१२ अंडी

अनेकदा आपण केळी किंवा अंडी घेताना पाहतो की दुकानदार नेहमी एक डझनमध्ये तुम्हाला १२ केळी किंवा १२ अंडीच देतो.

१२ संख्या का?

पण तुम्ही कधी विचार केला आहे का की एक डझनमध्ये नेहमी १२ नग का मिळतात? त्यामागचं कारण काय आहे.

मोजणीची पद्धत

एका डझनमध्ये १२च मोजणी करण्याचं कारण असं आहे की पूर्वी लोक मोजणीसाठी हाताच्या बोटांवरील सांध्यांचा उपयोग करत असत.

१२ सांधे

एका हाताच्या चार बोटांमध्ये एकूण १२ सांधे असतात, त्यामुळे १२ ही संख्या मोजणीसाठी योग्य मानली गेली.

डुओडेसिमल सिस्टीम

यावरूनच डझन म्हणजे १२ असा अर्थ प्रचलित झाला, ज्याला डुओडेसिमल सिस्टीम (Duodecimal System) असं म्हणतात.

समान भाग

एक डझनमध्ये १२च मोजणी करण्यामागचं दुसरं कारण म्हणजे १२ या संख्येला समान भागांत विभागणं खूप सोपं असतं. जसं की २, ३, ४ किंवा ६ ने भाग देता येतो.

योग्य संख्या

जर १० किंवा १५ ला विभागायचं झालं तर त्याचे तुकडे करावे लागतील, जे कठीण होतं. त्यामुळे १२ ही संख्या डझनसाठी योग्य मानली जाते.

Maharashtra Tourism: लोणावळा, खंडाळाही पडेल फिकं! नाशिकजवळ असलेलं 'हे' कमी गर्दीचं हिल स्टेशन तुम्हालाही पाडेल भूरळ

येथे क्लिक करा