Bakrid 2025: बकरी ईद का आणि कशी साजरी केली जाते? जाणून घ्या या सणाचा अर्थ आणि महत्त्व

Dhanshri Shintre

बकरी ईद

बकरी ईद किंवा ईद-उल-अजहा हा मुस्लिमांच्या मुख्य सणांपैकी एक आहे. या दिवशी बकऱ्यांचा बळी दिला जातो आणि गरिबांमध्ये वाटला जातो.

Bakrid 2025 | Freepik

कारणे आणि श्रद्धा

आज आम्ही तुम्हाला बकरी ईद साजरी होण्यामागील कारणे आणि श्रद्धा सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला या सणाची पूर्ण माहिती मिळेल.

Bakrid 2025 | Freepik

कधी सुरु झाली?

बकरी ईदच्या कुर्बानीची परंपरा हजरत इब्राहिम यांच्या काळात सुरू झाली, ज्यांना अल्लाहचा पहिला पैगंबर मानले जाते, आणि त्यांची परीक्षा घेण्यात आली.

Bakrid 2025 | Freepik

बलिदान

परीक्षेसाठी अल्लाहने हजरत इब्राहिमला स्वप्नात त्याचा आवडता मुलगा इस्माईल बलिदान देण्यास सांगितले, ज्यावर त्यांनी श्रद्धेने मान्यता दिली.

Bakrid 2025 | Freepik

गोंधळवण्याचा प्रयत्न

पैगंबर हजरत इब्राहिम आपल्या मुलाला बलिदान देण्यासाठी जाताना सैतानाने त्यांना गोंधळवण्याचा प्रयत्न केला, पण ते दृढनिश्चयी राहिले आणि चुकले नाहीत.

Bakrid 2025 | Freepik

बलिदान देण्याचा निर्धार

हजरत इब्राहिम आपल्या निर्णयावर ठाम राहण्यासाठी मुलाच्या डोळ्यावर पट्टी बांधून स्वतः बलिदान देण्याचा निर्धार केला होता.

Bakrid 2025 | Freepik

श्रद्धेची परीक्षा

हजरत इब्राहिम यांनी कुर्बानी द्यायला पुढाकार घेताच, अल्लाहने त्यांच्या श्रद्धेची परीक्षा घेतली आणि इस्माईलच्या जागी एका मेंढ्याची कुर्बानी स्वीकारली.

Bakrid 2025 | Freepik

वाईट सवयींचीही कुर्बानी

हजरत इब्राहिम यांच्या काळापासून साजरा होणाऱ्या बकरी ईदमध्ये केवळ बकऱ्याची नव्हे, तर वाईट सवयींचीही आत्मिक कुर्बानी दिली जाते.

Bakrid 2025 | Freepik

NEXT: वट सावित्रीच्या दिवशी वडाच्या झाडाला कोणता धागा बांधावा? जाणून घ्या यामागचे धार्मिक महत्त्व

येथे क्लिक करा