Manasvi Choudhary
२७ ऑगस्ट २०२५ रोजी गणपती बाप्पाचे घरोघरी आगमन होणार आहे.
गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केल्या इच्छा पूर्ण होतात.
गणपतीला २१ दुर्वा वाहतात. गणपती बाप्पा २१ दुर्वा वाहण्याचे शास्त्र काय आहे? जाणून घ्या.
गणपतीला २१ दुर्वा वाहण्यामागे पौराणिक कथा आहे.
ऋषि मुनी आणि सर्व देवताना अनलासुर नावाचा असुर त्रास देत होता. अनलासुर हा फार शक्तीशील होता. अनल म्हणजे अग्नी
ऋषि मुनी आणि सर्व देवतांच्या आग्रहामुळे गणपतीने अनलासुराला गिळून टाकले. असुराला गिळल्यानंतर त्याची तप्त उर्जेने गणपतीच्या पोटात जळजळ होऊ लागली.
यानंतर ८८ सहस्त्र मुनींनी प्रत्येकी २१ हिरव्यागार दुर्वा गणपतीच्या मस्तकावर ठेवल्या आणि कश्यप ऋषीनी २१ दुर्वाची जुडी गणरायाल खायला दिली.
गणपतीने २१ दुर्वाची जुडी खाल्यानंतर त्याच्या पोटात होणारी जळजळ थांबली. यापुढे मला कोणाही २१ दुर्वा अर्पण केल्यास हजारो यज्ञ, व्रत, दान केल्याचे पुण्य लाभेल. असे गणपती म्हणाले. म्हणून गणपतीला २१ दुर्वा वाहतात.