ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित छावा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. छावा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालत आहे.
औरंगजेब स्वतः मुघल सैन्य घेऊन दख्खन काबीज करण्यासाठी महाराष्ट्रात आला होता.
औरंगजेबाने मराठा साम्राज्याला सर्व बाजूने वेढण्याचा प्रयत्न केला होता.
छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने अनेक युद्धांमध्ये मुघल सैन्याचा पराभव केला होता.
१६८७ मध्ये मुघलांविरुद्ध झालेल्या युद्धात संभाजी महाराजांचा विजय झाला. परंतु सेनापती हंबीरराव मोहिते शहीद झाले.
यामुळे स्वराज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. याच परिस्थितीचा फायदा घेऊन संभाजी महाराजांच्या जवळच्याच माणसांनी त्यांच्याविरुद्ध कट रचण्यास सुरुवात केल्याचा दावा छावा चित्रपटात करण्यात आला.
गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के यांनी फितूरी करत संभाजी महाराजांची माहिती मुघलांना दिल्याचे छावा चित्रपटात दाखवण्यात आले.
गणोजी शिर्के हे संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई यांचे भाऊ होते.
संभाजी महाराजांना पकडण्यास मदत केली तर दक्षिणेकडील अर्धे राज्य त्यांना दिले जाईल,असे अमिष गणोजी आणि कान्होजींना दिल्याचे चित्रपटात दाखवलेय.
त्यांच्या आमिषाला बळी पडून गणोजी आणि कान्होजी यांनी संभाजी महाराज कुठे आहेत हे औरंगजेबाच्या सैन्याला सांगितल्याचा दावा चित्रपटात करण्यात आला.