छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकावेळी सिंहासनाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला कोणाला स्थान दिलं होतं?

Surabhi Jayashree Jagdish

श्री शिवराज्याभिषेक दिन सोहळा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक राज्याभिषेक सोहळ्याला आता ३५० वर्षे झाली आहेत. मात्र आज मोठ्या उत्साहात श्री शिवराज्याभिषेक दिन सोहळा दरवर्षी रायगडावर पार पडतो.

कधी झाला राज्याभिषेक?

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा ६ जून १६७४ रोजी रायगड किल्ल्यावर पार पडला होता

लोकांची उपस्थिती

छत्रपतींचा राज्याभिषेक पाहण्यासाठी विविध ठिकाणाहून लोकं आले होते.

मान

छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये अष्टप्रधानांचा मोठा वाटा होता. त्यामुळे सिंहासनाच्या दोन्ही बाजूंना त्यांची उपस्थिती होती.

सिंहासनाची डावी बाजू

सिंहासनाच्या डाव्या बाजूला सेनापती हंबीरराव मोहिते सरनोबत, डबीर सुमंत राचंद्र त्रिंबक, न्यायाधीश रावजी निराजी आणि रघुनाथराव पंडितराव यांना स्थान देण्यात आलं होतं.

सिंहासनाची उजवी बाजू

सिंहासनाच्या उजव्या बाजूला मुख्यप्रधान (पेशवा) मोरोपंत पिंगळे, मुजुमदार अमात्य रामचंद नीलकंठ, सुरनिस सचिव अण्णाजी दत्तो, वाकनीस-मंत्री दत्ताजी त्रिंबक यांना स्थान दिलं गेलं होतं.

रायगडाची जीवनकथा

शांताराम विष्णु आवळसकर लिखित रायगडाची जीवनकथा या पुस्तकात याबाबत माहिती देण्यात आलेली आहे.

Shivaji Maharaj Rajyabhishek: राज्याभिषेकावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोशाख कसा होता?

येथे क्लिक करा