Priya More
अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरामध्ये हेलिकॉप्टरला अपघात झाला. या अपघातामध्ये सीमेन्सचे सीईओ ऑगस्टिन एस्कोबार यांचा मृत्यू झाला.
ऑगस्टिन एस्कोबार हे कुटुंबासोबत स्पेनवरून न्यूयॉर्कमध्ये सुट्टी इन्जॉय करण्यासाठी आले होते त्यावेळी ही धक्कादायक घटना घडली.
हेलिकॉप्टर अपघातामध्ये ऑगस्टिन एस्कोबार यांच्यासह त्यांची पत्नी आणि ३ मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
ऑगस्टिन एस्कोबार हे कुटुंबासोबत हेलिकॉप्टरमध्ये बसले. उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत ते नदीत कोसळले.
ऑगस्टिन एस्कोबार २७ वर्षे सीमेन्स कंपनीमध्ये कार्यरत होते.
१९९८ मध्ये ऑगस्टिन एस्कोबार यांनी स्पेनमध्ये पॉवर ऑटोमेशन सिस्टीम्ससाठी विक्री आणि प्रकल्प व्यवस्थापन प्रमुख म्हणून काम सुरू केले.
कठोर परिश्रम आणि समर्पणाच्या जोरावर ऑगस्टिन एस्कोबार हे २०२२ मध्ये सीमेन्स स्पेनचे अध्यक्ष आणि सीईओ झाले.
ऑगस्टिन एस्कोबार हे सीमेन्स मोबिलिटी साउथवेस्ट युरोपचे सीईओ देखील होते.
ऑगस्टिन एस्कोबार यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक देशांमध्ये ऊर्जा, वाहतूक आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावली.