Surabhi Jayashree Jagdish
फोडणीचा भात अनेकदा शिळ्या भातापासून बनवला जातो आणि काही लोकांसाठी तो आरोग्यदायी पर्याय असू शकत नाही.
त्यामुळे काही व्यक्तींनी फोडणीचा भात खाऊ नये ते पाहूयात.
ज्यांना पोटाशी संबंधित जुनाट आजार आहेत, जसं की पोटाला सूज येणं, वारंवार पोटदुखी किंवा पचनाचे त्रास, त्यांनी फोडणीचा भात खाणं टाळावं. शिळा भात पुन्हा गरम करून खाल्ल्याने हे त्रास वाढू शकतात.
पांढऱ्या भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो, ज्यामुळे तो रक्तातील साखर वेगाने वाढवतो. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी फोडणीचा भात खाऊ नये.
रात्रीच्या वेळी भात खाल्ल्यास शरीरात चरबी साठून राहते आणि वजन वाढू शकते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवायचे असल्यास किंवा वजन कमी करायचे असल्यास, रात्री फोडणीचा भात खाणं टाळा.
शिळा भात पचायला जड असतो आणि त्यामुळे पचनसंस्था कमकुवत असलेल्या व्यक्तींना गॅस, बद्धकोष्ठता आणि इतर पचनाच्या समस्या येऊ शकतात.
शिळा भात पुन्हा गरम केल्यास त्यात 'बॅसिलस सेरेयस' नावाचा बॅक्टेरिया वाढतो. हे बॅक्टेरिया पूर्णपणे नष्ट होत नाहीत आणि फूड पॉयझनिंगला कारणीभूत ठरू शकतात.