Manasvi Choudhary
उन्हाळ्याच्या दिवसात बाजारात सर्वत्र दिसणारे फळ म्हणजे जांभूळ. जांभळाला भारतीय इंग्रजी भाषेत प्लम किवा ब्लॅकबेरी असे म्हणतात.
जांभूळ मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर मानले जाते. शरीराची रोगप्रतिकारशक्ती ते पचनक्रिया सुधारण्यापासून उपयुक्त आहे मात्र तरीदेखील काही व्यक्तींसाठी जांभळाचे सेवन घातक ठरू शकते.
गोड- आंबट चवीचे जांभूळ हे फळ फायदेशीर असले तरी काही लोकांनी ते खाणे टाळावे.
किडनी स्टोनचा त्रास असलेल्या व्यक्तींनी जांभूळ खाणे शक्यतो टाळावे.
गर्भवती महिलांनी चुकूनही जांभळाचे सेवन करू नये.
ज्या व्यक्ती गोळ्या, औषधं घेत आहेत अश्या व्यक्तींनी जांभळाचे सेवन करू नये.
मधुमेहाची औषधे घेत असलेल्या व्यक्तींनी देखील जांभूळ खाणे टाळावे यामागचे कारण म्हणजे तुम्ही मधुमेहाच्या औषधासोबत त्याचे सेवन केल्यास रक्तातील साखर प्रमाणापेक्षा कमी होऊ शकते यामुळे घाम येणे, चक्कर येणे, हृदयाचे ठोके वाढणे या समस्या होऊ शकतात.
ज्यांना पुरळ येणे, सूज येणे, खाज सुटणे या सारंख्या त्वचेच्या समस्या असणाऱ्या व्यक्तींनी जांभळाचे सेवन करू नये.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.