Manasvi Choudhary
वजन कमी करण्यासाठी तुम्ही घरीच सोपे उपाय करू शकता. बेसनापासून काही पदार्थ तुम्ही बनवू शकता. जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील.
बेसनमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे , कॅल्शियम ही गुणधर्मे असतात. बेसन वजन कमी करण्यासाठी मदत करते. बेसनापासून बनवलेले पदार्थ खाल्ल्याने कॅलरीज वाढत नाही.
यासाठी आज आम्ही तुम्हाला बेसनपासून कोणत्या रेसिपी बनवायच्या याविषयी या सांगणार आहोत.
बेसन चिला हा एक सोपा आणि आरोग्यदायी नाश्ता आहे तुम्ही बेसन, कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची घालून बनवू शकता.
बेसन भाजून त्यात हळद, लसूण, जिरे याचे मिश्रण शिजवून सेवन करा यामुळे पोट भरलेले राहते वजन वाढत नाही.
बेसन , ओट्स , दही मिक्स करून तुम्ही घरच्याघरी ढोकळा बनवू शकता .
बेसन आणि दही याचे मिश्रण तयार करून तुम्ही कढी बनवू शकता. यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.