Manasvi Choudhary
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं. त्यांची नात जनाई भोसलेने शनिवारी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या प्रकृतीबाबत अपडेट दिली होती.
जनाई भोसले ही आशा भोसले यांची नात आहे. ती नेहमी आशा भोसले यांच्यासोबत प्रत्येक कार्यक्रमात दिसायची.
जनाई सोशल मीडियावर चर्चेत असते. जनाई लवकर अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. जनाईचा 'द प्राईड ऑफ भारत- छत्रपती शिवाजी महाराज' हा ऐतिहासिक चित्रपट आहे.
या चित्रपटात तिने मुख्य भूमिका साकारली असल्याची माहिती आहे. हा चित्रपट २०२७ मध्ये प्रदर्शित होणार आहे.
जनाईचा जन्म २००२ मध्ये मुंबईत झाला. जनाईच्या वडिलांचे नाव आनंद भोसले तर आईचे नाव अहुजा भोसले आहे.
जनाई २३ वर्षांची असून तिने स्वित्झर्लंडच्या रोझी इन्स्टिट्यूटमधून शिक्षण पूर्ण केलं.
जनाईला गायन, नृत्य आणि लेखनाची आवड आहे. तिचे स्वत:चे युट्यूब चॅनेल आहे.