Ankush Dhavre
भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा विवाह बंधनात अडकला आहे.
त्याने रविवारी (१९ जानेवारी) हरियाणातील सोनीपतमध्ये राहणाऱ्या हिमानी मोरसोबत लग्न केलंय.
भारताच्या गोल्डन बॉयला क्लिनबोल्ड करणारी हिमानी आहे तरी कोण? जाणून घ्या.
२७ वर्षीय हिमानी सध्या अमेरिकेत शिक्षण घेत आहे.
ती न्यू हॅम्पशायरच्या फ्रँकलिन पियर्स यूनिव्हर्सिटीमधून स्पोर्ट्स मॅनेजमेंटचं शिक्षण घेत आहे.
तिने दिल्लीतील मिरांडा हाऊसमधून सोशल सायन्स आणि फिजिकल एज्युकेशनचं शिक्षण घेतलं आहे.
हिमानी टेनिस प्लेअर देखील आहे.
अखिर भारतीय टेनिस महासंघच्या वेबसाईटनुसार, २०१८ मध्ये तिची सर्वश्रेष्ठ रँकिग ४२ होती.