Surabhi Jayashree Jagdish
दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती आणि भारताची बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे.
22 डिसेंबर रोजी सिंधू लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. पीव्ही सिंधूचे वडील पीव्ही रमण यांनी याबाबत माहिती दिलीये.
सिंधूच्या वडिलांनी सांगितलं की, दोन्ही कुटुंबं पूर्वीपासून एकमेकांना ओळखत होती. एक महिन्यापूर्वीच सर्व काही ठरलं होतं.
वडिलांनी सांगितले की, 22 डिसेंबरला लग्नसोहळा होणार आहे. 24 डिसेंबर रोजी हैदराबादमध्ये रिसेप्शन होणार आहे. 20 डिसेंबरपासून लग्नाशी संबंधित कार्यक्रम सुरू होतील.
पीव्ही सिंधूचा भावी पती व्यंकट हे पोसाइडेक्स टेक्नॉलॉजीजमध्ये कार्यकारी संचालक आहेत. तो हैदराबादला राहणारा असून Posidex Technologies प्रामुख्याने भारतात डेटा मॅनेजमेंटसंबंधी कंपनी आहे.
पीव्ही सिंधूने नुकतंच लखनऊमध्ये झालेल्या सय्यद मोदी इंटरनॅशनल स्पर्धेत विजेतेपद पटकावलं होतं. त्याने 2019 मधील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णासह एकूण 6 पदकं जिंकलीयेत.
सिंधूने चॅम्पियनने रिओ 2016 आणि टोकियो 2020 ऑलिम्पिकमध्ये सलग पदकं जिंकली होती. पीव्ही सिंधूने रिओमध्ये रौप्य आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावलं होतं.