Surabhi Jayashree Jagdish
भारतात छोले भटुरे खाणाऱ्यांचं प्रमाण अधिक आहे. छोले भटुरे हे पंजाबी खाद्य म्हणून ओळखलं जातं.
छोले भटुरे यांचं कनेक्शन भारतातील दिल्लीशी असल्याचं म्हटलं जातं. दिल्लीतील सीताराम नावाच्या व्यक्तीने याची सुरुवात केली होती.
लोकांना छोले आणि भटुरे इतके आवडले की ते त्यांच्या आहाराचा एक भाग बनले. हे कांदा आणि चटणीबरोबरही खास सर्व्ह करण्यात येतं.
छोले यांनी इंग्रजीत Chickpea म्हणतात, म्हणूनच त्याच्या भाजीला Chickpea Curry म्हणतात. आता भटुरे काय म्हणतात ते जाणून घेऊया.
भटुरे पिठापासून बनवले जातात. पीठ आंबवून भटुरा तयार करण्यात येतो. भटुरेंना फ्राईड फ्लॅटब्रेड्स म्हणतात.
छोले भटुरे केवळ भारतातच नाही तर पाकिस्तानच्या काही भागातही खूप लोकप्रिय आहेत.