महिनाभर चहा पिणं बंद केल्यास शरीरामध्ये काय बदल होतात?

Surabhi Jayashree Jagdish

चहा

चहा हा भारतात अनेकांचं आवडतं पेय आहे. जास्त चहा तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे.

महिनाभर चहा पिणं बंद

महिनाभर चहा पिणं बंद केल्यास तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतात.

झोपेची गुणवत्ता सुधारते

चहामध्ये कॅफिन असल्याने रात्री झोपाताना समस्या निर्माण होऊ शकतात. चहा पिणं बंद केल्याने झोपेची गुणवत्ता सुधारू शकते.

पचन कार्य

जास्त प्रमाणात चहा पिणं पचन क्रियेवर दबाव टाकतं. चहा पिणं थांबवल्याने तुमच्या पचन प्रणालीला विश्रांती मिळते. यामुळे गॅस, ऍसिडिटी, आणि पोटदुखीची समस्या कमी होऊ शकते.

हायड्रेशन

कॅफिनमुळे शरीराच्या हायड्रेशनवर नकारात्मक परिणाम होतो. चहा बंद केल्यास तुमचं शरीर अधिक चांगल्या प्रकारे हायड्रेटेड राहतं.

ब्लड शुगर

चहा प्यायल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. महिनाभर चहा न प्यायल्याने तुमचं रक्तातील साखरेचं प्रमाण अधिक नियंत्रणात राहण्यास मदत होते.

सुक्या भाजीत मीठाचं प्रमाण जास्त झालं तर 'हे' करा

salt | saam tv
येथे क्लिक करा