Sakshi Sunil Jadhav
जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती एलन मस्कने वैभव तनेजा यांना महत्वाची जबाबदारी दिली आहे.
एलन मस्क यांनी 'अमेरिका पार्टी' या पक्षाची स्थापना करून भारतीय व्यक्ती वैभव तनेजा यांना मोठी जबाबदारी दिली.
पुढे आपण वैभव तनेजा नेमके कोण आहेत? याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.
भारतीय वंशाचे वैभव तनेजा यांची अमेरिका पार्टीचे कोषाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
२०१७ मध्ये वैभव तनेजा यांनी टेस्ला कंपनी जॉइन केली.
२०२३ पासून वैभव तनेजा टेस्ला कंपनीमध्ये सीएफओ या पदावर काम करत आहेत.
टेस्ला कंपनीचे सध्या ते चीफ फायनान्स ऑफीसर CFO आहेत.
दिल्ली विश्वविद्यालयमध्ये त्यांनी शालेय शिक्षण आणि चार्टर्ड अकाउंटचा अभ्यास पूर्ण केला.
वैभव तनेजा यांनी पीडब्लूसी (प्राइसवॉटरहाऊसकूपर्स) मधून कामाची कारकिर्द सुरु केली.
पुढे वैभव तनेजा हे सोलरसिटी कंपनीत सामील झाले जी नंतर टेस्लाने विकत घेतली.