Manasvi Choudhary
उत्तरप्रदेशमधील प्रयागराज येथे महाकुंभ मेळा सुरू आहे.
१३ जानेवारीपासून ते २६ फेब्रुवारीपर्यंत ४५ दिवस हा कुंभमेळा सुरू आहे.
देशातील लाखों भाविकांची या कुंभमेळ्याला गर्दी पाहायला मिळतेय.
अशातच या कुंभमेळ्यातील निळ्या डोळ्यांच्या मुलीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
ही मुलगी तिच्या निळ्या डोळ्यांनी काही मिनिटांतच व्हायरल झाली.
इंदौर येथून ती कुंभमेळ्यामध्ये परिवारासोबत माळा विकायला आली आहे.
सोशल मीडियावर या मुलींचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे.