Ankush Dhavre
बझ ऑल्ड्रिन हा अमेरिकन अंतराळवीर, वैमानिक आणि अभियंता होता. त्याचा जन्म २० जानेवारी १९३० रोजी झाला.
अपोलो ११ हे पहिले यशस्वी चंद्रमोहिमेचे यान होते. यात तीन अंतराळवीर होते – नील आर्मस्ट्रॉंग, बझ ऑल्ड्रिन आणि मायकेल कॉलिन्स.
२० जुलै १९६९ रोजी, नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं. त्याच्यानंतर लगेचच बझ ऑल्ड्रिन चंद्रावर उतरला, तो दुसरा अंतराळवीर बनला.
ऑल्ड्रिन आणि आर्मस्ट्रॉंग २ तास १५ मिनिटं चंद्रावर होते. त्यांनी विज्ञान प्रयोग केले आणि अमेरिकेचा झेंडा चंद्रावर लावला.
तिसरा अंतराळवीर मायकेल कॉलिन्स कमांड मॉड्यूलमध्ये राहिला. त्याने चंद्राच्या कक्षेत राहून दोघांना परत घेण्यासाठी नियंत्रण सांभाळले.
ऑल्ड्रिनने चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाबाबत निरीक्षणं नोंदवली.
अपोलो ११ यानाने २४ जुलै १९६९ रोजी यशस्वीपणे पृथ्वीवर पुनरागमन केले.
अंतराळयानातून निवृत्त झाल्यानंतर त्याने विज्ञान आणि अंतराळ संशोधनाला चालना दिली.