Ankush Dhavre
सध्या भारतात छावा चित्रपटाची हवा पाहायला मिळत आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारीत असलेलाहा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी होतेय.
विक्की कौशल या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसून आला आहे.
तर रश्मिका मंधाना येसूबाईंच्या भूमिकेत दिसून आली आहे.
या चित्रपटात विक्की कौशल, संतोष जुवेकर आणि अक्षय खन्नासारखे स्टार अभिनेते आहेत.
दरम्यान एका मुलाखतीत विक्की कौशलला या चित्रपटातील खरा हिरो कोण? असा प्रश्न विचारण्यात आला होता.
त्यावेळी विक्की कौशलने छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेतलं.
विक्कीने साकारलेल्या भूमिकेचं जोरदार कौतुक केलं जातंय.