Siddhi Hande
अनुष्का शर्मा ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनुष्काने आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे.
अनुष्का शर्माच्या वडिलांचे नाव अजय कुमार शर्मा आहे. ते आर्मील कर्नल होते.
अनुष्का शर्माचे वडील सध्या निवृत्त झाले आहेत. त्यांनी अनेक युद्धांमध्ये सहभाग घेतला आहे.
अनुष्काचे वडील १९८२ पासून आर्मीत कार्यरत होते. त्यांच्या कामाचा मुलीला खूप अभिमान आहे.
त्यांनी आतापर्यंत अनेक मोठ्या ऑपरेशनमध्ये करता काम केले आहे. आर्मीत असताना त्यांनी आपल्या प्राणांचा विचार केला नाही. त्यांनी देशासाठी आयुष्य समर्पित केले होते.
कारगिल युद्ध ते ऑपरेशन ब्लू स्टारमध्येही अनुष्काचे वडील सहभागी होते.
जेव्हा वडील कारगिल युद्धात सहभागी होते तेव्हा अनुष्का फक्त ११ वर्षांची होती. त्यावेळी कोणाचाही फोन आला तरीही त्यांच्या कुटुंबियांना भीती वाटायची.
अनुष्काने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यावेळची परिस्थिती खूपच वाईट होती. माझी आई सतत रडत असायची. वडील सैन्यात असल्याने घरात सारखे भीतीचे वातावरण होते.