Siddhi Hande
अक्षया देवधर ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती नेहमीच आपल्या सालस आणि सोज्वळ अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.
अक्षया देवधर तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून घराघरात पोहचली. अक्षया नेहमीच मराठमोळ्या लूकमध्ये फोटोशूट करत असते. तिचे मंगळसूत्र महिलांना खूप जास्त आवडतात.
अक्षया नेहमी वेगवेगळ्या लूकसाठी वेगवेगळे मंगळसूत्र ट्राय करते.
एकदम सिंपल साडीवर शोभणारे काळ्या मण्यांचे सिंगल पदराचे मंगळसूत्र खूप शोभून दिसते. मध्यम आकाराचे मंगळसूत्र ज्याला मध्यभागी डायमंडची डिझाइन असेल.
दोन वाट्यांच्या मंगळसूत्राची क्रेझ कधीच कमी होणार नाही. मराठमोळ्या लूकवर हे मंगळसूत्र शोभून दिसेल.
दोन पदरी मंगळसूत्राच्या डिझाइनमध्ये जर छान मोठ्या डायमंडच्या वाट्या असतील तर ते आणखीनच सुंदर दिसेल. मोठ्या वाट्यांमुळे मंगळसूत्र उठून दिसते.
मंगळसूत्राच्या चैनीत काळ्या मण्यांसोबतच सोन्याचे मणीदेखील सुंदर दिसतात. सोन्याचे मणी मध्ये मध्ये असल्यावर अजून छान वाटते.
एकदम सिंपल, सोबर नाजूक डिझाइनचे मंगळसूत्रदेखील छान दिसते. ज्यामध्ये फक्त काळ्या मण्यांची दोरी आणि पेडंट असेल.
Next: बनारसी साड्यांचे हे 5 लेटेस्ट पॅटर्न, ट्रेडिशनल टू मॉडर्न लूक दिसेल भारी