Surabhi Jayashree Jagdish
कर्णाला नेहमी एक स्वप्न पाहिल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटायचं. त्याच्या स्वप्नात नेहमीच एक दुःखी स्त्री यायची.
जिचे अश्रू त्याच्या अंगावर पडत असत. खूप नंतर त्याला या स्वप्नाचा अर्थ समजला.
त्याच्या स्वप्नात दुःखी असलेली ती स्त्री कोण होती? त्या महिलेचा त्याच्याशी काय संबंध होता?
कर्णाला अनेकदा स्वप्न पडायचं की डोक्यावर पदर घेतलेली एक राजेशाही महिला त्याच्याकडे येत आहे.
हे स्वप्न पाहिल्यानंतर कर्ण नेहमीच अस्वस्थ व्हायचा आणि त्याची झोप उडायची. ही स्त्री दुसरी तिसरी कोणी नसून त्याची आई कुंती होती.
कर्णाने आपलं संपूर्ण आयुष्य त्याच्या आईवडिलांना शोधण्यात घालवलं आणि म्हणूनच त्याला स्वप्नात नेहमीच कोणत्या ना कोणत्या शक्तीचे संकेत मिळत असत
जेव्हा कुंती प्रत्यक्षात आली तेव्हा कर्णाला ती त्याच्या स्वप्नातील स्त्रीसारखीच आढळली पण तो तिला ओळखू शकला नाही.