Manasvi Choudhary
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर उपमुख्यमंत्रीपद हे कोण सांभाळणार असा प्रश्न उपस्थित होता.
अशातच महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदासाठी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव समोर आले.
कालपासून या सर्व घडामोडींना वेग आला असून आज सायंकाळी पाच वाजता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
यानुसार सुनेत्रा पवार नेमक्या कोण आहेत? सुनेत्रा पवार यांचा राजकीय प्रवासाविषयी जाणून घेऊया.
सुनेत्रा पवार यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९६३ मध्ये धाराशिवमध्ये झाला. सुनेत्रा पवार यांना जन्मापासून राजकीय वारसा लाभलेला आहे.
माजी मंत्री पद्मसिंह पाटील हे त्यांचे वडील आहेत. 1985 मध्ये सुनेत्रा पवार यांचा विवाह अजित पवार यांच्यांशी झाला.
सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आहेत आणि राज्यसभेच्या खासदार आहेत.
सुनेत्रा पवार यांनी सामाजिक कार्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. 'एन्व्हायरोमेंटल फोरम ऑफ इंडिया' च्या माध्यमातून त्यांनी पर्यावरण रक्षणासाठी मोठे काम केले आहे.