Manasvi Choudhary
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रमुख अजित पवार यांचे बुधवारी सकाळी विमान अपघातात निधन झाले.
अजित पवार यांच्या निधनाने सर्वानाच धक्का बसला. लाखो कार्यकत्यांसह, नेते मंडळीनी अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली.
अजित पवारांनी लहानांनपासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येकाच्या मनात घर केले. त्यांच्या जाण्याने सर्वत्रच शोककळा निर्माण झाली.
अजित पवार यांना कार्यकर्ते लाडाने 'दादा' म्हणून हाक मारायचे.
अजित पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला.
अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांचे पुतणे होते.
अजित पवार यांच्या पत्नीचे नाव सुनेत्रा पवार असून त्यांना पार्थ आणि जय हे दोन मुलगे आहेत.
अजित पवारांनी १९८२ मध्ये सहकारी संस्थांच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला १९९१ मध्ये ते पहिल्यांदा बारामती मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले
अजित पवार हे 6 वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले मात्र मुख्यमंत्री होण्याचं त्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं.