Shreya Maskar
शूरा खान ही अरबाज खानची दुसरी बायको आहे. अरबाज खान आणि शूरा खानने 2023 मध्ये लग्नगाठ बांधली.
लग्नाच्या दोन वर्षांनी अरबाज आणि शूरा खान आई-बाबा झाले आहेत. शूराने गोंडस मुलीला जन्म दिला आहे.
शूराने 5 ऑक्टोबरला लेकीला जन्म दिला असून वयाच्या 58 वर्षी अरबाज खान पुन्हा एकदा बाबा झाला आहे.
अरबाज खान आणि शूरा खानने लाडक्या लेकीचे नाव सिपारा खान (Sshura Khan) असे ठेवले आहे. शूरा खान कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
शूरा खान प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट आहे. आजवर तिने अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे.
शूराने अभिनेत्री रवीना टंडन आणि तिची मुलगी राशा थडानी यांच्यासोबत काम केले आहे.
शूरा खान आणि अरबाजची पहिली भेट 'पटना शुक्ला'च्या सेटवर झाली.
शूरा खान आणि अरबाज खानला त्यांच्या वयातील अंतरामुळे कायम ट्रोल केले जाते. मात्र कायम दोघे एकमेकांना पाठिंबा देताना पाहायला मिळतात.