Priya More
'खोक्या' उर्फ सतीश भोसले हा भाजप आमदार सुरेश धस यांचा कट्टर कार्यकर्ता आहे.
सतिश भोसले गेल्या 6 ते 7 वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहे.
शिरूर कासार भागात खोक्या नावानं त्याची दहशत आहे.
पार्टी खोक्या आणि गोल्डमॅन ही सतीश भोसलेची टोपण नावं आहेत.
सतीश भोसलेला राजकीय पाठबळ, गुंडगिरी आणि दहशतीची पार्श्वभूमी आहे.
पारधी कुटुंबातील सतीश भोसलेचं स्वत:चं घरही नाही.
सतीश भोसले बीडच्या शिरूर शहराजवळ पारधी वस्तीवर राहतो.
व्हीआयपी कल्चर, व्हीआयपी गाड्या आणि हातात सोन्याचे ब्रेसलेट आणि कडे असल्यामुळे गोल्डमॅन म्हणून ओळख.
सतीश भोसलेच्या अवतीभवती नेहमी गराडा आणि ताफा असतो. सतीश भोसलेवर अनेक गुन्हे दाखल आहेत.