Priya More
औरंगजेबाचे आग्रा येथे असलेल्या ताजमहलशी खास कनेक्शन आहे.
मुघल सम्राट शाहजहां आणि त्याची पत्नी मुमताज महल यांच्या पोटी औरंगजेबचा जन्म झाला.
ताजमहल हे शाहजहांने त्याची राणी म्हणजे औरंगजेबाची आई मुमताज महलच्या आठवणीत बांधले होते.
शाहजहां हे सर्व राणीपेक्षा मुमताज महलवर खूप प्रेम करत होता. शाहजहांची ती तिसरी पत्नी होती.
वयाच्या ३४ व्या वर्षी राणी मुमताजचे निधन झाले होते.
मुमताजचा मृत्यू बुरहानपूर येथे झाला. सहा महिन्यानंतर तिचा मृतदेह आग्रा येथे आणण्यात आला आणि दफन केला गेला.
मुमताज महल यांचे खरे नाव अर्जुमंद बानू बेगम होते. त्यांचा जन्म आग्रा येथे झाला होता.
मुमताज महल यांना १४ मुले झाली होती. तिचा तिसरा मुलगा औरंगजेब होता.
औरंगजेब हा महान मुघल सम्राटांपैकी सहावा आणि शेवटचा सम्राट होता.