Shreya Maskar
रॅपर बादशहाने पंजाबी अभिनेत्री आणि मॉडेल ईशा रिखीसोबत लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ ईशा रिखीच्या आईने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
बादशहा आणि ईशा गेले ४ ते ५ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. ईशाने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती एक मॉडेल आहे.
ईशा रिखीने सिप्पी गिलसोबत 'जट्ट बॉयज पुट जट्टन दे' या पंजाबी चित्रपटातून पदार्पण केले. तसेच अभिनेता अमरिंदर गिलच्या 'हॅपी गो लकी' या चित्रपटातही काम केले आहे.
ईशा रिखीने 2014 आणि 2015 मध्ये 'मेरे यार कमीने' आणि 'व्हॉट द जट' या चित्रपटांमध्ये दिसली. अभिनेत्रीच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे चाहते दिवाने आहेत.
2018 साली रिलीज झालेल्या 'नवाबजादे' या चित्रपटातून अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यात तिने वरुण धवनसोबत काम केले आहे. ती अनेक पंजाबी आणि बॉलिवूड संगीत व्हिडिओमध्ये झळकली आहे.
ईशा रिखीचा जन्म १९९३ मध्ये चंदीगड येथे झाला. अभिनेत्री आता ३२ वर्षांची आहे. ईशा हे पंजाबी चित्रपटसृष्टीतील एक सुप्रसिद्ध नाव आहे. अद्याप बादशहा आणि ईशा रिखीने आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले नाही.
बादशहा आणि ईशाचा पहिली भेट किंवा ओळख त्यांच्या कॉमन मित्रांमुळे झाली. त्यानंतर दोघे चांगले मित्र झाले आणि हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.
बादशाहाचे हे दुसरे लग्न आहे. बादशाहाने २०१२ला जस्मिन मसिहसोबत लग्न केले होते, मात्र त्यांचा २०२०ला घटस्फोट झाला.