Manasvi Choudhary
प्रसिद्ध क्रिकेटपटू हार्दिक पांड्या हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे.
हार्दिक पांड्या चर्चेत येण्याचं कारण म्हणजे नताशासोबत घटस्फोट झाल्यानंतर हार्दिक पांड्याच्या आयुष्यात आलेली माहिका शर्मा.
हार्दिक पांड्या आणि माहिका शर्मा एकमेकांसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचं बोललं जात आहे. मात्र हार्दिक आणि माहिका या दोघांनीही त्यांच्या नात्याची पुष्टी अद्याप दिली नाही.
सोशल मीडियावर या दोघांचे एकमेकांसोबतचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत.अशातच नेटकऱ्यांमध्ये एकच चर्चा रंगली आहे ती म्हणजे हार्दिक पांड्यासोबत असलेली माहिका शर्मा नेमकी आहे तरी कोण?
महिला ही हार्दिक पांड्यापेक्षा आठ वर्षानी लहान आहे. महिका शर्मा ही २४ वर्षाची आहे. मूळची दिल्लीची महिका शर्मा ही अभिनेत्री फिटनेस मॉडेल इनफ्ल्यूएन्सर आहे.
सोशल मिडिया माहिकाचे लाखोंमध्ये फॉलोअर्स आहेत. मॉडेलिंग आणि फिटनेस इंडस्ट्रीमध्ये महिका चांगली कमाई करते.