Manasvi Choudhary
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी लोणारी आणि शिवसेना युवानेते समाधान सरवणकर नुकतंच लग्नबंधनात अडकले आहेत.
४ डिसेंबर रोजी मुंबईत मोठ्या थाटामाटात या दोघांचा विवाहसोहळा पार पडला.
नुकतच लग्नानंतर तेजस्विनी आणि समाधान दोघेही हनिमूनला गेले आहेत. सोशल मिडिया इन्स्टाग्रामवर तेजस्विनीने लंडनमधील रोमॅन्टिक फोटो शेअर केले आहेत.
लंडनमध्ये दोघेही हनिमूनचा आनंद घेत आहे. या फोटोशूटमध्ये दोघेही रोमॅन्टिक अंदाजात दिसत आहेत.
या फोटोशूटसाठी दोघांनीही हटके लूक केला आहे. या दोघांचे फोटो सध्या चांगलेच चर्चेत आहेत.
तेजस्विनी लोणारीने फोटो शेअर करत तिने, 'तो मला ज्या प्रकारे हसवतो, तसं कुणीही हसवू शकत नाही' असं कॅप्शन फोटोला दिले आहे.
सोशल मीडियावर तेजस्विनीच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स अन् कमेंट्सचा वर्षाव केला आहे.