Manasvi Choudhary
जेवणाची चव वाढवण्यासाठी पूर्वीपासून विविध खडे मसाल्यांचा वापर केला जात आहे. मात्र आजकाल बाजारात विविध गरम मसाल्यांचे पाकीट मिळतात.
भारतातील गरम मसाल्यांचे परदेशातही अनेक चाहते आहेत. गरम मसाला वापरून बनवलेले जेवण अतिशय रूचकर लागते. यासाठी आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी गरम मसाले कसे बनवायचे हे सांगणार आहोत.
गरम मसाला बनवण्यासाठी जिरे, धणे, हिरवी वेलची, बेडकी मिरची, काळी मिरी, दालचिनी, तेजपत्ता, जायफळ, बडीशेप हे साहित्य एकत्र करा
सर्वातआधी गॅसवर पॅनमध्ये सर्व मसाले छान परतून घ्या. मसाले करपणार नाही याची काळजी घ्या. सर्व मसाले हलके भाजून झाल्यानंतर ते थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.
मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मसाले बारीक करून घ्या म्हणजेच मसाला तुमचा तयार होईल.
तयार झालेला मसाला काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा. मसाला हवा लागणार नाही याची काळजी घ्या.अशाप्रकारे घरच्या घरी गरम मसाला सोप्या पद्धतीने तयार होईल.