Shruti Vilas Kadam
२०२५ च्या आशिया कपमधील दमदार कामगिरीनंतर हार्दिक केवळ मैदानावरील प्रदर्शनामुळेच नव्हे, तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो.
हार्दिकचा २०२४ मध्ये मॉडेल आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकशी डिव्होर्स झाला. त्यांना अगस्त्य नावाचा एक मुलगा देखील आहे.
डिव्होर्सनंतर हार्दिकचे नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडले गेले, ज्यात जस्मिन वालियासह काही लोकप्रिय व्यक्तींचीही चर्चा झाली.
आता हार्दिकचे नाव मॉडेल आणि अभिनेत्री महिका शर्मासोबत जोडले जात असून, ती सध्या चर्चेचा नवीन विषय ठरत आहे.
माहिकाचा एका नवीन फोटोने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे, ज्यामध्ये तिच्या बोटांवर ‘३३’ हा आकडा लिहिलेला दिसतो. विशेष म्हणजे, हा आकडा हार्दिक पंड्याच्या जर्सी नंबरशी जुळत असल्याने चर्चांना आणखी उधाण आले आहे.
हार्दिक आणि माहिका एकमेकांना इंस्टाग्रामवर फॉलो करत असल्याचे चाहत्यांच्या लक्षात आले असून त्यामुळे या चर्चांना आणखी उधाण आले आहे.
मॉडेल-अभिनेत्री महिकाने इकॉनॉमिक्स आणि फायनान्स या विषयात पदवी प्राप्त केली आहे. तिने अनेक म्यूझिक व्हिडिओ आणि ब्रँड जाहिरातींमध्ये काम केले आहे.